तडीपार गुंडा…

ब्राह्मणी संघात राहून डावपेच शातीर दिमाखाने शिकणारे, बोलणारे आणि भारत देशाचा जबाबदार गृहराज्यमंत्री जर त्यांना *देवपण* जपून स्वर्ग मिळत असेल तर त्यांनी स्वतःच्या गळ्यात 108 मण्याची माळ टाकून किंवा हातात धरून जपत राहावे नक्कीच धरतीवरच्या सुखापेक्षा स्वर्गातील सुख अधिक लाभी होईल.
*पण माझ्या बापाने सदविवेकबुद्धी जागृत ठेवून तुमच्या मनुस्मृतीने जी आमच्या पूर्वजांची कुचंबना , हेळसांडणी , अन्याय – अत्याचार केलेत त्यावर कृतीतून मात करून मनुस्मृतीच चिरडून , खाक करण्यासाठी म्हणून या धरतीवर ज्ञानाचा सूर्य उगवला आणि जहाल मनुस्मृतीच्या छाताडावर लाथ देऊन ती तुमच्या पूर्वजांच्या डोळ्यादेखत जाळून तुमच्यासारखा दुजाभाव न करता तुम्हाला आणि आम्हाला समानतेच्या एका रेशोत बांधून मोकळा श्वास देऊन गेला. भारत देशाच्या संस्कृतीला व इतिहासाला कोणताही धोका न पोहोचता ” मानवता ” जागविली. ते जगविख्यात नाव म्हणजे तडीपार गुंडाच्या मुखातून निघालेलं ” फक्त आंबेडकर ” हेच नसून ज्ञानसूर्य , प्रज्ञावंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होय*….. 🌄
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणीच पचनी पटत नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत