दिन विशेषमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचाराने विद्यार्थाने मार्गक्रमण करावे

विज्ञानाच्या प्रगती बरोबर विद्यार्थांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास होणे गरजेचे :- पो नि गजेंद्र सरोदे

डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लीश मेडीयम स्कूल मध्ये मार्गदर्शन कार्यशाळा

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

मनुष्याचे मानवी जीवन सुखी होण्यासाठी विज्ञानाच्या साधनांची गरज तर शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज आहे ,कारण मनुष्याच्या अंतरंग समृद्धीसाठी मानवी नीती मूल्याची जोपासना करणे त्याचबरोबर शैक्षणिक विचार धारेतील कणखरपणा हा विद्यार्थांना मानसिक सामर्थ्य देऊन विद्यार्थी घडविण्याचे काम प्रामाणिक पणे करते म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक धोरण अवलंबून शिक्षणासाठी सामर्थ्याने बलशाली विचारांचा प्रभाव घेणे महत्त्वाचे आहे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण झाली पाहिजे त्याचबरोबर विद्यार्थी व्यसनापासून दूर असला पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता असली पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आत्मविश्वास असला पाहिजे ह्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना बळ देणारे आहेत त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आपली गुणवत्ता वाढीसाठी अतोनात प्रयत्न करावेअसे प्रतिपादन नळदृग पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी केले
नुकताच नळदुर्ग येथे डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये चेतना निर्माण व्हावी गुणवत्ता प्राप्तीसाठी एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती त्यावेळेस ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्य प्रवर्तक संस्थापक मारुती खारवे हे होते तर प्रमुख पाहुणे रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे शाळेच्या मुख्याध्यापिका कविता पाटील सह शिक्षक गायकवाड हे उपस्थित होते .
प्रथमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रथमता नळदुर्ग ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती खारवे यांनी शाल फेटा बुके देऊन स्वागत पर सत्कार केले यावेळी रिपाईचे नेते अरुण लोखंडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले शेवटी आभार सहशिक्षक गायकवाड यांनी मानले

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!