भारतमुख्यपान

 “जम्मू-काश्मीर मधील चकमकीत सचिन लौर या जवानाने दिले प्राणांचे सर्वोच्च बलिदान.”

जम्मू- काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत उत्तर प्रदेशमधील अलीगढमधील जवानाने प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले. सचिन लौर असे त्या जवानाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे, आठ डिसेंबर रोजी सचिन यांचे लग्न होणार होते. ते थोड्याच दिवसांतर सुट्टी घेऊन गावी येणार होता, त्यापूर्वीच त्यांना वीरमरण आले.

 दहशतवाद्यासोबतच्या चकमकीपूर्वी त्यांनी कुटुंबासोबत फोनवर चर्चा केली होती. इकडे सगळे काही ठीक आहे. दोन दहशतवाद्यांना उडवून येतो असल्याचे सांगितले होते, पण पुढच्याच क्षणाला होत्याचे नव्हते झाले.

सचिन लौर हा अलीगढमधील नगरिया गौरोला या गावातील आहे. २० मार्च २०१९ रोजी सचिन लौर हे आर्मीमध्ये दाखल झाले होते. २०२१ मध्ये त्यांनी स्पेशल फोर्समध्ये कमांडो म्हणून पदभार स्वीकारला होता. सध्या ते राजौरीच्या पॅरा टू रेजीमेंटमध्ये तैनात होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!