मुंबई-पुणे दृतगती महामार्ग ८ पदरी करण्याचा प्रस्ताव…

महामार्गावरच्या खोपोली एक्झिट ते कुसगाव इथल्या सुमारे १३ किलोमीटरच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम सुरू आहे. मुंबई-पुणे मार्गाचं रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लवकरच राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवणार आहे. यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आठपदरी होणार आहे. याअंतर्गत दोन्ही बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. या कालावधीत मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद राहील. प्रवाशांना पर्यायी मार्गानं प्रवास करता येईल. अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं दिली आहे. दरम्यान, द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचं काम उद्या दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत