आमदारांना का द्यावा मान आणि धन?

आमदार खासदार मंत्री ला आपण नेता मानतो.म्हणून तर निवडून देतो. निवडून आल्यावर आमदाराला किमान दोन लाख मानधन व इतर भत्ते मिळतात.खासदाराला त्यापेक्षा जास्त.मंत्रीला तर दरमहा साडेतीन लाख तर उघड उघड मिळतात.बाकी इतर फौजफाटा चा खर्च वेगळाच.कमीशनचा हिशोब नंतर घेऊ.
इतका पैसा दरमहा नियमित मिळतो.कलेक्टर पेक्षा जास्त.तरीही याला मानधन का म्हणतात? ही लपवालपवी आहे.छुपवाछुपवी आहे.हा पगार असतो.तो कामासाठी असतो.मेहरबानी नाही.इतका पगार घेऊन हे लोक त्या प्रमाणात काम करतात का? आतापर्यंत आमदार सुरेश भोळेंनी किती काम केले?
जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात सर्कल दहा फुट व्यासाऐवजी २८फुट व्यासाचे बांधले.यात आमदार भोळे आणि खासदार उन्मेष पाटील यांची जबाबदारी होती.हे सर्कल लहान करण्यासाठी.पण हे ढिम्मच.का?यांना हायवे मक्तेदाराने खिशात घालून घेतले.तरीही आम्ही मान द्यावा का?मान देऊन वर धन ही द्यावे का?
जळगाव शहरातील रस्ते अत्यंत खराब झाले.आतापर्यंत आमदार सुरेश भोळेंनी किती ठिकाणी मक्तेदार आणि सार्वजनिक बांधकाम अभियंता ला बोलवून दुरूस्ती करून घेतले ?मी स्वतः आमदारांना पद्मालय रेस्ट हाऊस समोर संध्याकाळी सात वाजता उखडलेला रस्ता पाहण्यासाठी बोलवले.आमदार म्हणाले,मी मीटिंग मध्ये आहे.संध्याकाळी सात वाजता कोणत्या कार्यालयात मीटिंग चालते? त्या दिवशी कुठे होती?असे वर्तन जर असेल तर का द्यावा मान आणि धन?
रायसोनीनगरमधील रस्ते व गटारी ची वर्क दोन वर्षांपासून आयुक्त ने नगरसेवकाला दिलेली होती.नगरसेवक खिशात घालून पन्नास टक्के मिळवून देणारे मक्तेदार शोधत होते.जळगांव शहरातील कामाची वर्क ऑर्डर आयुक्त ,सीटी इंजिनिअर मक्तेदाराला देत नाहीत.नगरसेवकाला देतात.तो शोधतो काम न करता पैसा
मिळवून देणारा मक्तेदार.हे आमदार भोळेंनी रायसोनीनगर मधील लोकांना सांगितले पाहिजे होते.पण नाही.आम्ही लोक जमा गेले आणि आमदार फॅशन शो चे उद्घाटन करायला निघून गेले.रस्ता महत्वाचा कि फॅशन शो?
कोर्ट ते गणेश कॉलनी रस्त्याची वर्क ऑर्डर डिसेंबर २०२०मधे दिली होती.डिसेंबर २०२२पर्यंत कामच सुरू केले नाही.का?आम्ही आणि खडसेंनी तेथे जाऊन चिरफाड केली.तेंव्हा काम सुरू केले.आधी श्रेयाचे थडगे बांधले, बैनर लावले , नंतर काम सुरू केले.केले तर केले ते एका वर्षात उखडून गेले.येथे आमदारांची जबाबदारी नाही का?नागरिकांनी ओरड करावी.यांनी शेणावर माती ढकलावी.तरीही का द्यावा मान आणि धन?
काव्यरत्नावली ते वाघनगर रस्ता मागील दहा वर्षांपासून बरबाद झाला आहे.आता २०२१मधे डांबरीकरण करण्याची सुरुवात केली.आणि अर्धवट सोडून दिला.महाजन जयश्री महाजन एकदा आल्या.म्हणे रस्ता फेस टू फेस बनवून देते.पण काहीच काम केले नाही.का?असा अर्धवट प्रस्ताव,अशी अर्धवट वर्क ऑर्डर दिली होती का?आता दोन वर्षांपासून तेथे नरेंद्र मोदी, गिरीश महाजन सोबत श्रेयाचे बैनर चार वेळा लावले.तरीही रस्ता बनवलाच नाही.शहराचे आमदार म्हणून भोळेंची जबाबदारी नाही का?तरीही का द्यावा मान आणि धन?
यशवंत नगर मधे आधीच महानगरपालिकेने ललित कोल्हेंना डांबरीकरण चे काम दिले.काम चालू.तरीही तेथे आमदार भोळेंनी सार्वजनिक बांधकाम कडून दुसऱ्याच मक्तेदाराला वर्क ऑर्डर दिली.तेथे बैनर बनवले.भुमिपुजन करण्याचे ऐलान केले.पण हेराफेरीचे, घुसखोरीचे बींग फुटले.आमदारांनी बनवलेले बैनर न लावता “दत्त मंदिर कडे जाणारा रस्ता”या नेम प्लेट वर हार घातला.हा पोरकटपणा नाही का?तरीही का द्यावा मान आणि धन?
गिरणा टाकी जवळ प्रितम वाईन शॉप कडे येणारे पांच रस्ते डांबरीकरण करून दिले.का? दुकानावर येणारा तळीराम खड्ड्यात पडून मरायला नको.जर जळगाव मधील सर्वच रस्ते वाईन शॉप कडे जात असतील तर आबादी होईल कि बरबादी?तरीही आमदारांना मान आणि धन द्यावे का?
आमदारांना बोगदा कळत नाही.शिवाजीनगर पुल कळला नाही.हायवेवरील कानळदा बायपास कळला नाही.आकाशवाणी सर्कल कळले नाही.गांधी मार्केट चे डांबरीकरण कळले नाही.शंभर फुटी रोड कळला नाही.तर मग कळले काय? जर नागरी सुविधांकडे आमदारांचे लक्ष नाही.लक्ष वेधले तरीही वळले नाही.वळले तरीही कळले नाही तरीही का द्यावा मान आणि धन?
आता आमदार भोळेंनी बाकडे घेऊन त्यावर स्वताचे नांव कोरले.”आमदार सुरेश भोळेंची स्वताची जमीन विकून नागरिकांना सप्रेम भेट.” जर हे बाकडे सरकारी पैशांनी घेतले असतील तर आमदारांचे नाव का? आमचा पैसा.आमचाच कर.आमचाच निधी.आणि नांव आमदाराचे?श्रेय आमदाराचे?कमीशन आमदाराचे?
फक्त जळगाव नव्हे पुर्ण जिल्ह्यातील, पुर्ण महाराष्ट्रातील आमदार असे कमीशन आणि श्रेय उपटत आहेत.तरीही का द्यावा मान आणि धन?बेलगाम कमीशनखोरीला लगाम लावण्याची वेळ आली आहे.
शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत