५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचं राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

देशातील विविध संस्था आणि विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे हे प्रदर्शन विज्ञानाचा उत्सव झाल्याचं प्रतिपादन राज्यपाल बैस यांनी केले.उद्घाटन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार,उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर उपस्थित होते. पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल इथं ५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज झाले. कार्यक्रमापूर्वी राज्यपालांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रदर्शनात ३१ राज्यातील १७३ बाल वैज्ञानिक आपल्या प्रतिकृतीसह सहभागी झाले आहेत. बाल विज्ञान प्रदर्शन ‘तंत्रज्ञान आणि खेळणी’या विषयावर आधारित आहे. शाळांमधूनही अशा प्रदर्शनाचं आयोजन केल्यास विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता वाढीस लागेल, विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातील चांगल्या निर्मितीचे प्रयत्न सुरू ठेवावेत, असे आवाहन राज्यपाल बैस यांनी केले. या कालावधीत राज्यातील शाळांमध्ये विज्ञान पंधरवडा साजरा होणार असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे दिली. प्रदर्शनाचं आयोजन राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन,नवी दिल्लीतील प्रशिक्षण परिषद, राज्य शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं केले आहे. हे प्रदर्शन ३० डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत