प्रत्येक सर्वसामान्य भारतीय नागरिकाला शेवटचे एकच आवाहन.

जर आपण तन -मन -धनाने आपल्या सदसदविवेक बुद्धीने अंतर्मुख होऊन समर्पण करण्यास स्वच्छेने तयार असाल…….
तर मी ( अनंत भवरे ) आपल्या सर्वांच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक एक दिवस मुक्काम करत रस्त्यावर उतरून रॅलीच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून सोबत टीम घेऊन संपूर्ण महाराष्ट्र EVM+VVPAT ला हटविण्यासाठी, मुख्य निवडणूक आयोगाच्या विरोधात खडबडून जनजागृती करण्यासाठी मी सज्ज आहे…
कारण काहीही करून आपल्याला येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत EVM+VVPAT ला हटवणे हेच सध्यातरी अंतिम ध्येय समजून जनजागृती करणे आमची व आमच्या भावी पिढीची गरज आहे.
यासाठी आम्हाला कुणी राजकीय पक्ष समर्थन देईल ही भोळी भाबडी अपेक्षा न करता, जनतेचा लढा जनतेनीच लढला पाहिजे, या तत्वावर मी आपल्यासाठी मी जनतेचाच एक भाग असून माझी सदसदविवेक बुद्धी मला हा शेवटचा लढा लढण्यास प्रव्रत करत आहे..
परंतू , आपली सदसदविवेक बुद्धी काय म्हणते हे मला आपल्याकडून जाणून घ्यायचे आहे…
जर आपला होकार असेल तर केवळ होकार देऊन चालणार नाही, तर त्यासाठी आपल्या जिल्ह्यात येण्याचा जो दिनांक असेल त्या दिवशी प्रत्येकाने निदान 5/10 बंधू /भगिनी सोबत आणलेच पाहिजेत..
तेंव्हा कुठे आपण EVM +VVPAT ला हटवण्यासाठी घणाघाती घाव घालू शकतो….!
हा प्रश्न मी आज आपल्याला विचारू शकतो नंतर नाही, कारण आपला होकार असेल तयारी करण्यासाठी निदान 12/15 दिवस लागणार आहेत. पोलीस महासंचालकाकडून ( मुंबई ) पोलीस परवानगी काढणे, गाडीची तयारी करणे, लोकांना सोबत घेण्याची तयारी करणे, पत्रके बनवणे, वगैरे, इत्यादी कामे……….
आणि आपण जर का जानेवारी महिन्याच्या 15 तारखेपर्यंत जर संपूर्ण नियोजन करून करू शकलो नाही, तर मग आपली शेवटची संधी सुद्धा गमावून बसू……!
कारण फेब्रुवारीत शेवटच्या आठवड्यात आचारसंहिता जर लागली तर आपल्या सर्वांनाच हात चोळत बसण्याशिवाय पर्याय नाही…
म्हणून आपल्याला हे शेवटचे असे एकच आवाहन मी आपल्याला करत आहे…..
या आवाहनाला आपला होकार असेल तर (YES ) म्हणून मला माझ्या याच नंबरवर होकार कळवा……
अन्यथा (NO ) म्हणून आपली प्रतिक्रिया कळवा…..!
यासाठी कोणतेही बंधन नाही…..
प्रतिक्रिया कळविण्याचे बंधन असेल, तेही आज आणि उद्या दोनच दिवसात …….!
(ज्याप्रमाणे आम्ही गेल्यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात 36 जिल्हे आणि 40 दिवसाची संविधान जनजागरण रॅली काढली होती अगदी त्याप्रमाणेच परंतू आतामात्र स्वरूप मोठे आणि जबाबदारी मोठी असेल.)
आवाहनकर्ता :- अनंत केरबाजी भवरे
( संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत