राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपति जगदीप धनखड़ आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून ‘सदैव अटल’ स्मारकावर पुष्पांजली अर्पण

माजी राष्ट्रपति रामनाथ कोविंद, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लोकसभा सभापती ओम बिरला, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही वाजपेयींना पुष्पांजली वाहिली. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपति जगदीप धनखड़ आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या 99व्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीतल्या ‘सदैव अटल’ स्मारकावर पुष्पांजलि अर्पण केली. राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुंबईत राजभवन इथे वाजपेयीच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. यावेळी राज्यपालांचे सचिव, राजभवनातील अधिकारी , कर्मचारी तसंच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत