
इस्रायलनं नाताळच्या पूर्वसंध्येला गाझाच्या मध्यवर्ती भागात केलेल्या हल्ल्यात ६८ जण ठार झाले. हल्ल्यानंतर गाझाच्या मध्यवर्ती भाग धूरानं वेढला होता. या हल्ल्यानंतर वेस्ट बँक बेथलेहेम इथं नाताळच्या सुट्टीनिमीत्त आयोजित सोहळा रद्द केला गेला. या वाटाघाटींसाठी पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचा प्रमुख नेता झियाद अल-नखाला चर्चेसाठी इजिप्तमध्ये दाखल झाला होता. युद्ध थांबल्यावरच आपण कैद्यांची सुटका करू असा दावा त्यांनी केला. संघर्षादरम्यानच इस्रायलच्या ताब्यात असलेल्या पॅलेस्टिनींच्या सुटकेसाठीच्या करारावरील वाटाघाटींसाठीचे प्रयत्नही शेजारच्याच इजिप्तमध्ये सुरुच आहेत. हमासच्या प्रशासकीय आणि लष्करी क्षमतेचा खात्मा करून, त्यांच्या ताब्यातल्या आपल्या १२९ कैद्यांची सुटका करण्याच्या उद्देशावर ते ठाम आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत