देशदेश-विदेशभारतमुख्य पानमुख्यपान

लाल समुद्रात हिंदुस्थानचा झेंडा असलेल्या जहाजावर ड्रोनहल्ला..

हा हल्ला येमेनमधील हुथी हंडखोरांनी केल्याचा दावा अमेरिकन लष्कराने केला आहे. जहाजावर कोणतीही जीवितहानी झालेली नसून या जहाजाने या भागात गस्तीवर असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेला आपत्कालीन संदेश पाठवला होता. त्यानंतर यूएस सेंट्रल कमांडने एक्स अकाऊंटवरून हल्ल्याबाबतची माहिती शेअर केली.  हिंदुस्थानचा झेंडा असलेल्या गॅबनच्या मालकीच्या एमव्ही साईबाबा या जहाजावर ड्रोनहल्ला झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, जहाजावर असलेले 25 हिंदुस्थानी कामगार सुरक्षित असल्याचे हिंदुस्थानी नौदलाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर हिंदुस्थानी नौदल सतर्क झाले आहे. लाल समुद्राच्या दक्षिणेकडे प्रवास करत असताना दोन जहाजांवर हल्ला झाल्याचे अमेरिकन नौदलाने म्हटले आहे. त्यानंतर हिंदुस्थानचा झेंडा असलेल्या आणखी एका जहाजावर लाल समुद्रात हल्ला झाला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!