देशात शिक्षणाचे झपाट्याने बकालीकरण, निर्बुद्धीकरण

साधना प्रकाशनातर्फे राजन हर्षे यांच्या ‘पक्षी उन्हाचा सात विद्यापीठांच्या आवारात’ या पुस्तकाचे प्रकाशन कुबेर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. साधना ट्रस्टचे अध्यक्ष विवेक सावंत, साधना प्रकाशनाचे संपादक विनोद शिरसाठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव या वेळी उपस्थित होते.
कुबेर यांनी देशातील शिक्षणाच्या सद्यःस्थितीवर भाष्य केले. ‘विद्याथ्यांची कीव यावी, अशी परिस्थिती आहे. पुढील आव्हाने काय आहेत, हे त्यांना सांगितले जात नाही. समाजात पूर्वी विद्वान माणसे होती आणि त्यांना आदर दिला जायचा. आज तसे राहिलेले नाही. आज कुणाला शिक्षक व्हावेसे वाटत नाही. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ २.५ टक्के खर्च शिक्षणावर होतो तर विज्ञान तंत्रज्ञानावर एक टक्काही खर्च होत नाही. भारतीयांच्या अर्थांधळेपणाचा फटका शिक्षणाला बसत आहे. देशात शिक्षणाप्रती असलेली उदासीनता गंभीर आहे. त्यामुळेच भारत जगात सर्वाधिक विद्यार्थी निर्यात करणारा देश आहे,’ असे ते म्हणाले.
परदेशात विद्यापीठांची शैक्षणिक उंची वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याकडे शिक्षणाशी दुरान्वये संबंध नसणारे लोक देशाचे शिक्षणमंत्री झाले. या परिस्थितीचे आपण तटस्थपणे मूल्यमापन करणार की नाही? शिक्षणावरील गुंतवणूक हा विषय राजकीय पक्षांच्या कार्यक्रम पत्रिकेवर असायला हवा, असेही कुबेर यांनी सांगितले. राजन हर्षे हे बहुआयामी
शिरसाठ यांनी लेखांच्या पुस्तक निर्मितीची प्रक्रिया सांगितली, तर हर्षे यांनीही मनोगत व्यक्त करताना देशातील बिघडत चाललेली शिक्षण व्यवस्था, राजकीय हस्तक्षेप यावर भाष्य केले.
व्यक्तिमत्त्व आहे. संशोधन, अध्यापन, लेखनासह त्यांना नाटकात, संगीतामध्ये रस आहे. त्याचे सुंदर वर्णन त्यांनी पुस्तकात केले आहे. हर्षे यांनी अतिशय निष्ठेने, निर्भयपणे काम केले. अनेक वर्षे महाराष्ट्राबाहेर राहूनही त्यांनी मराठीत केलेले लेखन सुबोध, रसाळ आहे. त्यांचे हे लेखन नाट्यमय आहे, असे सावंत म्हणाले.
शिरसाठ यांनी लेखांच्या पुस्तक निर्मितीची प्रक्रिया सांगितली, तर हर्षे यांनीही मनोगत व्यक्त करताना देशातील बिघडत चाललेली शिक्षण व्यवस्था, राजकीय हस्तक्षेप यावर भाष्य केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत