
संसदेच्या सुरक्षा उल्लंघन प्रकरणी बिर्ला यांनी सर्व खासदारांना पात्र पाठवून याबाबत माहिती दिली आहे. या समितीने आपल्या कामाला सुरुवात केली असून याचा अहवाल लवकरच सभागृहात सामायिक केला जाईल असं त्यांनी सांगितलं. संसदेत १३ डिसेंबर रोजीच्या घटनेच्या सखोल तपासणीसाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं.
संसदेच्या आवारातल्या सुरक्षेबाबत विविध पैलू तपासण्यासाठी उच्चाधिकार समितीही स्थापन केली असून अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत याचा आढावा ही समिती घेईल असं त्यांनी सांगितलं. संसद आवारातील सुरक्षा संसदेच्या अधिपत्याखाली येत असून खासदाररांकडून प्राप्त झालेल्या सूचनांच्या अनुषंगाने याबाबत सविस्तर कृती योजना आखणे संसदेची जबाबदारी असल्याचं बिर्ला यांनी म्हटलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत