दिन विशेषमुख्यपान

सुरत विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून जाहीर करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक क्षेत्रात सुरतचा दबदबा वाढणार. यामुळे सुरत हे आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी प्रवेशद्वार बनण्याबरोबरच या शहरातल्या हिरे आणि कापड या उद्योगांसाठी आयात-निर्यात अधिक सुविहित पद्धतीनं होणार आहे, असं याबाबतच्या निवेदनात नमूद करण्यात आले.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळानं इटलीशी औद्योगिक स्वामित्व हक्क करार करण्यासाठीही मंजुरी दिली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि इटलीचं उद्योग मंत्रालयाचं औद्योगिक स्वामित्व हक्क महासंचालनालय यांच्यात याबाबत संयुक्त सहकार्य करार होणार आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये औद्योगिक स्वामित्व हक्क आणि माहिती-तंत्रज्ञानाबाबत सहकार्य विकसित करण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. त्याचा उद्योगांना-विशेषतः स्टार्टअप्स आणि लहान उद्योगांना लाभ मिळणार.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!