महाराष्ट्रमुख्यपान

एकच पर्व ओबीसी सर्व, घोषणाने आटपाडी मध्ये मोर्चा!

सांगली : आटपाडी येथे ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा चे आयोजन करण्यात आले. आज आटपाडी बस स्थानक ते तहसील कार्यालय पर्यंत तालुक्यातील हजारो ओबीसी बांधव बारा बलुतेदार यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये ओबीसी नेतृत्व करणाऱ्या अनेक नेते मंडळीवर अर्वाच्य भाषेत व एकेरी भाषेमध्ये उल्लेख करणाऱ्या काही समाज बांधवाकडून होत आहे त्यामुळे त्यांचाही या ठिकाणी निषेध करण्यात आला व छगनराव भुजबळ ,गोपीचंद पडळकर यांना दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी मोठमोठ्या घोषणा देत एकच पर्व ओबीसी सर्व.अशा घोषणेने परिसर दणाणून सोडले यामध्ये, यु.टी .जाधव सर आरपीआयचे राजेंद्र खरात, माजी सरपंच रावसाहेब सागर, बाबासाहेब माळी ,उत्तमराव बालटे ,तुकाराम माळी ,बजरंग फडतरे, रामदास नाईकनवरे, रंणजीत ऐवळे, यशवंत मेटकरी, प्रभाकर पुजारी, जालिंदर खंडागळे, प्रवीण खंडागळे, सुरेश मोटे,संतोष लांडगे,सोमनाथ राक्षे, जगन्नाथ लोखंडे, चंद्रकांत कोळेकर ,जयवंतराव सरगर, प्रशांत माळी, विजय राक्षे, रघुनाथ यादव अशा पद्धतीने हजारो ओबीसी बांधव या मोर्चाला सहभागी होते. शेवटी तहसीलदार सचिन ढवळे व पी. आय.शरद मेमाणे यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता झाली..

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!