कणकवली येथे जानेवारीत सम्यक साहित्य कला संगीती.

चिपळूण – कोकणातील अर्थात अपरान्त भूमीतील आंबेडकरी व पुरोगामी परिवर्तनवादी साहित्यिकांचा, कलावंतांचा हक्काचा विचारमंच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी’ या संस्थेच्या वतीने दिनांक २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी ‘दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगीती’चे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे करण्यात आले. या संगीतीच्या अध्यक्षस्थानी मराठीतील ज्येष्ठ साहित्यिका व आयदानकार उर्मिला पवार यांची तर संगीतीचे उद्घाटक म्हणून हिंदीतील जेष्ठ साहित्यिक, संपादक मोहनदास नैमिशराय (दिल्ली) यांची निवड करण्यात आली. अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी या संस्थेची मुंबईत नुकतीच सभा पार पडली. या सभेत वर्ष २०२४ मध्ये होणाऱ्या दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतीच्या नियोजनाबाबत निर्णय घेण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रबोधिनीचे अध्यक्ष व दलित पँथरचे सहसंस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक ज. वी. पवार होते. या बैठकीस प्रबोधिनीचे कार्याध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर, सरचिटणीस सुनील हेतकर, उपाध्यक्ष प्रा. आशालता कांबळे, भावेश लोखंडे, प्रा. डॉ. संजय खैरे, सल्लागार रमाकांत जाधव आदी होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत