गगनयान मोहिमेची आज होणार पहिली उड्डाण चाचणी, कुठे पाहता येणार थेट प्रक्षेपण?

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) गगनयान मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. सतीश धवन अंतराळ केंद्रातून गगनयान मोहिमेच्या व्हिकल टेस्ट फ्लाईटचं आज पहिलं परिक्षण (चाचणी उड्डाण) केलं जाणार आहे. गगयान मिशनचं चाचणी उड्डाण टीव्ही डी १ आज सकाळी लॉन्च केलं जाणार आहे. इस्रोने मानवासहित ही योजना आखली असून क्रू मॉडेलला सुरक्षितरित्या उतरण्याची तयारी पूर्ण केली आहे.
गगनयान मोहिमेत ३ सदस्यांची टीम ३ दिवसांच्या मोहिमेसाठी पृथ्वीच्या ४०० किमी वरच्या कक्षेत पाठवलं जाणार आहे. हे क्रु मॉडेल समुद्रात सुरक्षितपणे उतरवले जाईल. जर या मोहिमेत भारत यशस्वी झाला तर असं करणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. त्यामुळे आजचा क्षण भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे.
गगनयान मोहिमेसाठी अनेक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहेत. या यानामधून अंतराळवीरांना सुरक्षित नेणे-आणणे हे महत्त्वाचे आहे. प्रक्षेपण, ‘क्रू’ला जीवनावश्यक सुविधा, संकटकालीन सुविधा, अंतराळात जाण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण, व्यवस्थापन अशा अनेक घटकांचा विचार तंत्रज्ञान निर्मितीवेळी केलेला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत