महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

आम्ही शुद्र, मग आमच्यात का येता?-भुजबळ.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिकच्या येवल्यात दोन दिवस अगोदर अवकाळी पावसाची पाहणी केली होती. त्यावेळी काही लोकांनी छगन भुजबळ यांचा ताफा ज्या ठिकाणाहून गेला तिथला रस्ता गोमूत्र शिंपडून पवित्र केला होता. त्यावरून छगन भुजबळ यांनी जोरदार हल्ला चढवला.
छगन भुजबळ म्हणाले, होय मी शुद्र आहे. माझं लहानपणापासूनचं आयुष्य दलित, बौद्ध, मराठा, लिंगायत आणि यूपीच्या भय्यांसोबत गेलं. मी दलितांसोबत वाढलो. मी आहेच शुद्र. आम्ही ओबीसी शुद्र आहोत. तुम्ही गोमूत्र शिंपडता. आणि मग तुम्ही आमच्याबरोबर शुद्र होण्यासाठी कुणबी सर्टिफिकेट मागता आणि आमरण उपोषण करता? अरे वारे वा चोंग्यांनों. आम्ही शुद्र नाय़ मग कशाला आमच्यात येता. तुम्ही उच्च तर उच्च. राहा तिकडे उंचीवर. रस्ते मीच बनवले. झाडू ते मारत आहेत. त्याला काय करायचं?, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!