प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

मुंबई पुणे महामार्गावर २ भीषण अपघातात खासगी बसमधील ११ प्रवासी जखमी होऊन एक चालक ठार तर दुसरा गंभीर.

मुंबई – रविवारी मध्यरात्री पुणे द्रुतगती महामार्गावर दुधाच्या टँकरने एका गाडीला जोरात धडक दिल्याने दोन अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून अकरा जण जखमी झाले आहे. दुधाच्या टँकरने एका गाडीला जोरात धडक दिल्याने अपघात झाला त्यात टँकर चालकाचा जागेवरच मृत्यू झाला. टँकरचालकाला स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. तर दुसऱ्या अपघातात खाजगी बसने अज्ञात वाहनाला धडक दिल्याने अपघात झाला आहे. याअपघातातही बस चालकाचा जागेवर मृत्यू झाला.

मुंबई ते कोल्हापूर ही बस मुंबईकडून पुण्याच्या दिशेने चालली होती. या बसने अज्ञात वाहनाला धडक दिल्याने चालकाच्या बाजूची केबिन पूर्णपणे तुटली होती. यात चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. आज पहाटेच्या सुमारास मुंबईहून पुण्याला दिशेने निघेलेली खाजगी बस ही बोरघाटात आल्यानंतर तिची एका अज्ञात वाहनाला धडक बसली. यात चालकाची बाजू पूर्णपणे तुटून गेल्याने चालकाला बाहेर पडता न आल्याने तो जखमी झाला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!