महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

नवाब मलिक यांना महायुतीत घेण्याला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध असल्याचं पत्र अजित पवारांना लिहिलं, त्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया.

नवाब मलिक हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी बाकावर बसले, यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आणि खासकरून भाजप शिवसेनेवर निशाणा साधला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक यांच्या महायुतीत येण्याला विरोध असल्याचं स्पष्ट केलं. एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी थेट सोशल मीडियावरच हे पत्र शेअर केलं.
देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्रावरून सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना डिवचलं आहे. ‘या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अजित पवारांना विचारावी लागतील, पण हे दुर्दैवी आहे. ज्या पद्धतीने नवाब भाई आणि या गटाचा अपमान भ्रष्ट जुमला पार्टीने केला, पत्र लिहून ते एवढं गावभर करायची काहीच गरज नव्हती. हा अपमान आहे, मी तरी सहन केला नसता’, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!