
6 डिसेंबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची बैठक सुरू झाली असून आज शुक्रवारी पतधोरणाची घोषणा होणार आहे.गेल्या दोन दिवसात देशाच्या आणि बँकांच्या आर्थिक स्थितीबाबत पतधोरण समितीच्या सदस्यांसोबत सविस्तर चर्चा झाली आहे. त्यानंतर आता शुक्रवारी रेपो दरासंदर्भातील निर्णय जाहीर केला जाणार आहे. दर स्थिर राहिल्यास कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. पतधोरण समितीच्या बैठकीत रेपोदरात वाढ केली जाणार नसल्याचा अंदाज तज्ञांकडून वर्तविला जात आहे. समितीच्या मागील चार द्वैमासिक बैठकांमध्ये रेपो दर जैसे थे ठेवण्यात आला होता. सध्या आर्थिक विकासदर योग्य पातळीवर असल्यामुळे ह्यावेळीही रेपोदर स्थिर राहण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, रेपो दराबरोबरच आरबीआय गव्हर्नर अन्य कोणत्या नव्या घोषणा जाहीर करतात याकडे देशवासियांचे लक्ष लागलेले आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्विमासिक बैठक 6 ते 8 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत