महाविकास आघाडीची आज महत्वपूर्ण बैठक

मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठकीचे नियोजन चर्चगेट इथल्या एमसीए लाऊन्जमध्ये रात्री सात वाजून ३0 मिनीटात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीचे संयोजक आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीला महाविकास आघाडीचे सगळे आमदार उपस्थित राहणार आहेत
हे नेते उपस्थित राहणार या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार . या बैठकीत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, समाजवादी पार्टीचे अबू आझमी,शेकापचे नेते जयंत पाटील, शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षनेते अजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड तसेच विधानपरिषद सदस्य शिवसेनेचे आमदार अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची प्रमुख उपस्थिती असणार
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत