क्युरेटिव्ह पिटीशनवर आज सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात आज होणारी सुनावणी निर्णायक असणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटीशनवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आज निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष..
आजच्या सुनावणीत युक्तिवाद होणार नाही. तर फक्त दालनात आज केस पुढे चालवायची की नाही याचा आज निर्णय होईल. यासाठी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि 3 न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत.
मराठा आरणक्षासाठीची ही क्युरेटिव्ह पिटीशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरूद्ध अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री लक्ष्मण पाटील अशी आहे. तसंच मराठा आंदोलक विनोद लक्ष्मण पाटील विरूद्ध जयश्री लक्ष्मण पाटील अशा या दोन क्युरेटिव्ह पिटीशन आहेत. तर न्यायालय आता याबाबत निर्णय घेईल की, जयश्री पाटील किंवा इतरांना नोटीस बजावायची की नाही. बऱ्यातदा क्युरेटिव्ह पिटिशन सुरुवातीच्या टप्प्यातच याचिका फेटाळली जाते. त्यामुळे आज या प्रकरणी काय होतं? हे पाहणं महत्वाचं असेल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत