
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन्ही खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी पाहून बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी ड्रेसिंग रूममध्ये त्यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी केकही कापण्यात आला. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा ३७ वा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ ऑक्टोबर रोजी ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने २४३ धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांची उत्कृष्ठ कामगिरी होती. संघासाठी किंग कोहलीने शानदार फलंदाजी करताना नाबाद शतक झळकावले. यानंतर रवींद्र जडेजान दमदार गोलंगदाजी करताना ५ विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन्ही खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी पाहून बीसीसीआयने ड्रेसिंग रूममध्ये त्यांचे विशेष अभिनंदन केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत