मुख्यपानराजकीय

 शीख दहशतवाद्याच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी अमेरिकेने दाखविले थेट भारताकडे बोट

अमेरिकेचा चौकशीसाठी दबाव?

‘वॉशिंग्टन पोस्ट’ने बुधवारी दिलेल्या वृत्तानुसार पन्नूच्या हत्येच्या कटाबाबत चौकशी सुरू करण्यासाठी अमेरिकेचे दोन अत्यंत वरिष्ठ अधिकारी दोनवेळा भारतात येऊन गेले. सीआयएचे संचालक विल्यम जे. बर्न्स तसेच राष्ट्रीय गुप्तहेर खात्याचे संचालक अवरिल हाईन्स या दोन अधिकाऱ्यांनी ऑगस्ट व ऑक्टोबरमध्ये नवी दिल्लीला भेट दिली होती. तसेच ‘जी-२०’ परिषदेनिमित्त सप्टेंबरमध्ये भारतात आले असताना खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हा विषय काढला होता, असे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे.

निखिल गुप्ता या भारतीयाविरोधात आरोप निश्चित करण्यात आले असून त्याने एका भारतीय अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून हा कट रचल्याचा दावाही आरोपपत्रात करण्यात आला आहे. शीख दहशतवाद्याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेने थेट भारताकडे बोट दाखविले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे प्रकरण खलिस्तानी फुटिरतावादी गुरपतवंतसिंग पन्नू याच्याशी संबंधित असून याच प्रकरणात चौकशी समिती स्थापन केल्याचे बुधवारी भारताच्या परराष्ट्र खात्याने जाहीर केले.

अमेरिकेच्या न्यायखात्याने मॅनहॅटन न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राबाबत केंद्रीय सरकारी वकील डॅमियन विल्यम्स यांनी बुधवारी माहिती दिली. त्यानुसार निखिल गुप्ता याने भारत सरकारचा कर्मचारी असलेल्या व्यक्तीच्या मदतीने न्यूयॉर्कचा रहिवासी असलेल्या शिख फुटिरतावादी नेत्याच्या हत्येचा कट आखला होता. विल्यम्स यांनी खलिस्तानी फुटिरतावादी आणि कथित भारतीय अधिकाऱ्याचे नाव जाहीर केलेले नाही. गुप्ता याच्याविरोधात दोन आरोप ठेवण्यात आले असून तो सध्या झेक प्रजासत्ताक येथे अटकेत आहे. त्याचे अमेरिकेत हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

‘फायनान्शियल टाईम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राने गेल्या आठवड्यात अज्ञात स्त्रोतांचा हवाला देऊन पन्नूच्या हत्येच्या कटासंबंधी वृत्त दिले होते. पन्नू हा शीख फुटीरतावादी असून, खलिस्तान समर्थक आहे. त्याच्याकडे अमेरिका आणि कॅनडाचे नागरिकत्व आहे. भारतीय तपास यंत्रणांना विविध दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली तो हवा आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!