संविधान बदलू पाहणारी मानसिकता घातक – ॲड. गोमारे.

आज देश एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचला आहे मुस्लिम द्वेष पसरवला जात आहे धर्मनिरपेक्ष तत्वाला तिलांजली दिली जात आहे राम मंदिर सारखे प्रश्न केंद्र केंद्र स्थानी बनवले जात आहेत त्याहून महत्वाची बाब म्हणजे आज संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे संविधान बदलू पाहणारी मानसिकता देशाला घातक आहे असे परखड मत प्रसिध्द विधीज्ञॲड मनोहर गोमारे यांनी व्यक्त केलेसम्यक समाज संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ विचारवंत डॉ सुरेश वाघमारे हे होते तर विचार पीठावर ॲड मंचकराव डोणे डॉ बाळासाहेब गोडबोले प्राचार्य डॉ संजय गवई देवसटवार (प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण) अशोक मानकर (माजी उपायुक्त महिला बालकल्याण) ठाणे मारुती बनसोडे ॲड ढवळे डॉ नारायण कांबळे इ होतेपुढे बोलताना ॲड गोमारे म्हणाले की संविधान बदलण्याची भाषा गंभीरपणे घेतली पाहिजे कारण संविधान बदलले तर आपला देश खूप मागे जाणार आहे गुलामीच्या खाईत लोटला जाणार आहे म्हणून या मानसिकते विरुद्ध एक झाले पाहिजेया कार्यक्रमात डॉ प्रदीप आगलावे ( सचिव डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती)स्मृतीशेष एकनाथ आवाड प्रा प्रदीप रोडे यांना सम्यक समाज संघाच्या वतीने राष्ट्रीय संविधान सन्मान जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले या प्रसंगी डॉ आगलावे यांनी संविधान निर्मितीत बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवेश त्याचे संविधान निर्मितीतील योगदान अभ्यासपूर्ण भाष्य केले या प्रसंगी ॲड.मंचकराव डोणे(अध्यक्ष सम्यक समाज संघ) देवसटवार (प्रदेश उपायुक्त समाज कल्याण) उत्तम खंदारे सविता रविद्र कुलकर्णी शरद झरे इ नी आपले मनोगत व्यक्त केलेतसेच या कार्यक्रमात डी आय गायकवाड (आयुक्त साखर) अशोक मानकर ( माजी उपायुक्त महिला बालकल्याण)ठाणे उत्तम खंदारे (माजी उप – नगराध्यक्ष पूर्णा) रोहिदास मादले ( जन मॅनेजर बी एस एन ल) पत्रकार एजाज शेख ( दैनिक एकमत)सविता रवींद्र कुलकर्णी शरद झरे भवरे (यवतमाळ)यांच्या सह कला पंढरी या सेवा भावी संस्थेस उत्कृष्ट कार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष बी पी सूर्यवंशी यांना राष्ट्रीय संविधान विशेष सन्मान पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आलेया कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्यक समाज संघाचे सचिव डॉ बाळासाहेब गोडबोले यांनी केले सूत्र संचलन कानडे यांनी केले तर प्राचार्य डॉ संजय गवई यांनी संविधानाच्या उद्दिशिकाचे वाचन केले व आभार मानलेया कार्यक्रमास प्राध्यापक डॉक्टर वकील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत