क्रिकेटमहाराष्ट्रमुख्यपान

शुभमन गिलची कर्णधार म्हणून घोषणा.

 ‘आयपीएल’ मधील दहाही संघांनी आगामी हंगामासाठी कायम ठेवलेले खेळाडू आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी रविवारी जाहीर केली होती. (आयपीएल) क्रिकेटच्या पुढील हंगामासाठी सलामीवीर शुभमन गिलकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. तारांकित अष्टपैलू हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सकडे परतल्याने गुजरातला नेतृत्वबदल करावा लागला. तसेच मुंबईच्या संघाने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमरुन ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाकडे पाठवले आहे. यात गुजरातने हार्दिकला संघात कायम ठेवले होते. मात्र, पडद्यामागे हार्दिक गुजरातकडून मुंबईकडे परतण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. सोमवारी मुंबईचा संघ, तसेच ‘आयपीएल’ने याबाबत अधिकृत घोषणा केली. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने २०२२च्या हंगामात ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावले होते, तर गतहंगामात हा संघ उपविजेता ठरला होता. परंतु यानंतरही हार्दिकने ‘आयपीएल’मधील आपला पहिला संघ मुंबईकडे परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुजरात संघाने त्वरित गिलची कर्णधार म्हणून घोषणा केली.

२४ वर्षीय गिलने गेल्या हंगामात तब्बल ८९० धावा केल्या होत्या. त्यामुळे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला मिळणारी ‘ऑरेंज कॅप’ त्याने आपल्या नावे केली होती. तसेच एका हंगामात सर्वाधिक धावा करणाच्या विराट कोहलीच्या (९७३) विक्रमाच्याही गिल जवळ पोहोचला होता. आता कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळतानाच फलंदाज म्हणून दमदार कामगिरी सुरू ठेवण्यासाठी तो उत्सुक आहे.

‘‘गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी निवड होणे ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. फ्रेंचायझीने माझ्यावर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आमच्या संघाने गेल्या दोन हंगामांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. आता कर्णधार म्हणून ही यशस्वी कामगिरी सुरू ठेवण्यासाठी आणि आकर्षक शैलीतील क्रिकेट खेळण्यासाठी मी उत्सुक आहे,’’ असे गिलने नमूद केले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!