मुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

भारतीय संविधानाने देशाला समता समानता आणि अखंडता दिली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी खूप मोठे योगदान : – बनसोडे

नळदुर्ग शहरात फटाक्याची अतिषबाजी करत संविधान उद्देशिकांचे वाचन करण्यात आले .

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान निर्मिती करून तब्बल २ वर्षे ११ महिने १७ दिवस आपल्या स्वतः च्या बुद्धीवर ताण देऊन भारतीय संविधानाची निर्मिती केली आणि या संविधानाने संपूर्ण देशामध्ये समता , स्वतंत्र्य , बंधुता आणि न्याय समानता आणि अखंडता दिली आपला भारत देश लोकशाही प्रधान आसल्यामुळे या देशातला शेतकरी, कष्टकरी नागरीक सुखी आणी समाधानाने नांदत आहे .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत देशासाठी खूप मोठे योगदान आहे असे प्रतिपादन रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी केले .
नुकताच नळदुर्ग शहरात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळेस ते बोलत होते .प्रथमता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर भारतीय संविधान बोर्डाला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले प्रथमता बौद्धाचार्य तथा पत्रकार दादासाहेब बनसोडे निळ्या ध्वजांचे ध्वजारोहण करण्यात आले व त्रिशरण पंचशिल दिले यावळी वंचितचे आर एस गायकवाड , सम्राटग्रुपचे संस्थापक सूर्यकांत सुरवसे यानी मनोगत व्यक्त केले योगेश सुरवसे , सोनू बनसोडे ,
अक्षय सुरवसे , महादेव कांबळे भोई समाज मंडळाचे अध्यक्ष सुनिल ऊकंडे पत्रकार सुनिल बनसोडे , सिंकदर आंगुले , योगेश दुरुगकर , प्रशिक बनसोडे , रुषीकेश कांबळे , अमोल कांबळे , मुकेश लोखंडे , अमर बनसोडे , तुषार गायकवाड , वंचितचे शहराध्यक्ष शाम लोखंडे , किशोर के बनसोडे , मेजर मधुकर लोखंडे दत्ता कांबळे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते .यावेळी संविधानाची उद्देशिका बाबासाहेब बनसोडे वाचन केले शपथ दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दादासाहेब बनसोडे यानी केले हा सर्व कार्यक्रम बस स्थानकासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात घेण्यात आला यावेळी संविधान दिन चिरायू होवो आशा गगणभेदी घोषणा देण्यात आल्या शेवटी आभार प्रमोद गायकवाड यांनी मानले .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!