मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानवातावरण

नळदुर्ग महाविद्यालयात जागतिक जल दिन विविध उपक्रमाने साजरा

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथे ग्रीन क्लब समन्वयक प्रा डॉ उध्दव भाले आणि सहसमन्वयक प्रा डॉ निलेश शेरे यांच्या संकल्पतून तसेच उच्च शिक्षण मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्या परिपत्रका नुसार ‘ग्रीन क्लब ‘ च्या वतीने जागतिक जल दिन विविध उपक्रमांने साजरा करण्यात आला.
त्यामध्ये महाविद्यालयांच्या प्रांगणात पाणी व्यवस्थापन आणि पाणी बचत अनुशंगाने सर्व पोस्टर्स ग्रीन क्लब विध्यार्थी, प्राध्यापक यांच्यामार्फत विध्यार्थ्यामध्ये पाणी बचती संदर्भाने जनजागृती होण्यासंबंधाने सर्व विध्यार्थी, प्राध्यापक व इतर शिक्षकेतर कर्मचारी गोलाकार पद्धतीने उभे राहून ग्रीन क्लबची कार्यप्रणाली पहात होते. ह्या वेळी प्राचार्य डॉ सुभाष राठोड, उपप्राचार्य डॉ रामदास ढोकळे उपस्थित होते. त्या दरम्यान ग्रीन क्लब समन्वयक प्रा डॉ उध्दव भाले यांनी जागतिक जल दिन आपण का साजरा करित आहोत? आणि पाणी जपून वापरण्या संबधाने सर्वांना विस्तृत असे मार्गदर्शन केले आणि महाविद्यालयांतील ग्रीन क्लब कार्याची वाटचाल ही सांगितली. त्यानंतर पाणी व्यवस्थापण आणि पाणी बचत ह्यावर आधारित विविध सहा विषय घेऊन निबंध स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती त्यासंदर्भाने विजेत्या विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र ही देण्यात आले.
प्रथम क्रमांक कु संजना बनसोडे, द्वितीय क्रमांक आशिष पाटील आणि कु अर्पिता बशेट्टी, तृतीय क्रमांक शुभम मारेकर आणि उत्तेजनार्थ कु पूजा काळे, आश्विनी शिंदे, लोंढे समर्थ, आश्विनी जवळकोटे आणि वृषाली घंटे याना मिळाला.
या कार्यक्रमानंतर वनस्पतीशास्त्र विभागात जागतिक जल दिनानिमित्त रुषीकेश जेऊरे कु पूजा काळे, कु किर्ती इटकरी, ओमकार राजमाने, आशिष पाटील प्राचार्य डॉ सुभाष राठोड, उपप्राचार्य डॉ रामदास ढोकळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . या वेळी प्राचार्य डॉ सुभाष राठोड, उपप्राचार्य डॉ रामदास ढोकळे, प्रा डॉ उध्दव भाले, प्रा डॉ हसमबेग मिर्झा, प्रा डॉ तुळशीराम दबडे, प्रा डॉ दयानंद भोवाळ आणि प्रा डॉ लक्ष्मण थिट्टे आदी ग्रीन क्लब विध्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. प्रा डॉ निलेश शेरे यानी सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयांतील प्रा प्रशांत अमृतराव, प्रा डॉ दयानंद भोवाळ, प्रा डॉ हसमबेग मिर्झा, प्रा डॉ तुळशीराम दबडे , प्रा डॉ दिपक जगदाळे, प्रा डॉ समीर पाटील , प्रा डॉ अनिरुद्ध बाबरे प्रा डॉ हंसराज जाधव, प्रा आशिष हंगरगेकर, प्रा डॉ लक्ष्मण थिट्टे, डॉ कपील सोनटक्के, प्रा डॉ अतिश तिडके, डॉ अशोक कांबळे, प्रा. बाबासाहेब सावते प्रा डॉ दिपक जगदाळे , प्रा म्हमाणे, प्रा देव्हारे व आदी प्राध्यापक,श्री बारीक शिंदे, संशोधक विद्यार्थी श्री किरण हंताळकर, श्री अमर वाघोले ग्रीन क्लब युवा अध्यक्ष रुषीकेश जेऊरे, विध्यार्थी समन्वयक श्री अभिषेक जाधव आणि आदी ग्रीन क्लब मधील सर्व सक्रिय विध्यार्थी विध्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!