निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

दृष्टिहीन मतदारांसाठी ‘वोटर इन्फो ब्रोशर’ – राज्य निवडणूक आयोगाचा उपक्रम.

मुंबई : लोकसभा २०२४ साठी निवडणूक आयोग सज्ज आहे आणि राज्यात सर्व सोयसुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईसह राज्यातील दृष्टिहीन मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे एक अभिनव प्रयोग राबवण्याची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

याअंतर्गत, राज्यातील दृष्टिहीन मतदारांना मतदार नोंदणीपासून ते मतदानापर्यंतची सर्व माहिती ऑडिओ स्वरूपात देण्याचा विचार आयोगातर्फे सुरू आहे. ‘वोटर इन्फो ब्रोशर’ असे या ऑडिओ माहितीपुस्तकाचे नाव असून यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेचीही मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक मुख्य अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिली.

राज्यात सध्या एक लाख १६ हजार दृष्टिहीन मतदारांची नोंदणी पूर्ण झाली आहे. या सर्व मतदारांना आयोगातर्फे मतदार पावती पोहोचवण्याचे काम सुरू आहे. ही पावती ब्रेल लिपीमध्ये असेल. त्यामुळे या मतदारांना त्यांचे मतदान केंद्र, खोली क्रमांक आदी माहिती मिळणार आहे.

दरम्यान, दृष्टीहिन मतदारांना निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील सर्व माहिती ऑडिओ स्वरूपात देण्यासाठी राज्य निवडणूक आयोग काम करत असून यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!