देश-विदेशभीम जयंती 2024महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात “जग बदलणारा बापमाणूस” या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे थाटात प्रकाशन.

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात साजरी केली जाते. संपूर्ण जगातून अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिकलेल्या 100 प्रतिभावान नेत्यांच्या यादीत आपल्या बाबासाहेबांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. याच कोलंबिया विद्यापीठात आंबेडकर इंटरनॅशनल मिशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका भव्यदिव्य समारोहात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर लेखक व वक्ते जगदीश ओहोळ यांनी लिहिलेले प्रेरणादायी पुस्तक ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन मोठ्या थाटात आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील ज्ञानवंत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

या सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून हार्वर्ड विद्यापीठाचे स्कॉलर, लेखक, विचारवंत डॉ. सुरज एंगडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून कोलंबिया विद्यापीठातील जर्नालिझम विभागाचे प्रमुख जेलनी कॉब हे उपस्थित होते. यावेळी अमेरिकेतील आंबेडकर इंटरनॅशनल मिशनचे प्रमुख व कार्यक्रमाचे आयोजक विकास तातड, अभ्यासक चारुदत्त म्हसदे, नाशिक येथील संविधान प्रचारक शिवदास म्हसदे, कोलंबिया विद्यापीठातील अनेक दिग्गज मान्यवरांची विशेष उपस्थित होती. या सर्व मान्यवरांच्या हस्ते ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. 

नुकतेच 3 डिसेंबर 2023 रोजी प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या 14 एप्रिल 2024 रोजी अमेरिकेत 10 व्या आवृत्तीचे प्रकाशन झाले हे विशेष ! या पुस्तकामुळे मी पुन्हा वाचनाकडे वळलो, असे अनेक तरुण वाचक आवर्जून सांगत आहेत. अगदी कमी कालावधीत या पुस्तकाने विक्रीचा नवा उच्चांक गाठला आहे. 

कोलंबिया विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण झाले. आज येथे अनेक विद्यार्थी बाबासाहेबांच्या प्रेरणेतून शिक्षण घेत आहेत. कोलंबियात ‘आंबेडकर इंटरनॅशनल मिशन’च्या माध्यमातून भीमजयंती सह वेळोवेळी आम्ही आंबेडकरी विचारांचे विविध कार्यक्रम घेत असतो. या जयंती महोत्सवात भारतातील वक्ते व लेखक जगदीश ओहोळ यांनी लिहिलेले ‘जग बदलणारा बापमाणूस’ या प्रेरणादायी पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हे पुस्तक नव्या पिढीला जागतिक व सर्वव्यापी बाबासाहेब सांगणारे महत्वाचे पुस्तक आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!