53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव.

अर्थातच IFFI ला उद्यापासून सुरुवात होणार आहे.गोव्यातल्या तळेगाव इथल्या डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्याची सर्व रंगतदार तयारी झाली आहे.महोत्सवाच्या या आवृत्तीत 79 देशांतले 280 चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.डायटर बर्नर दिग्दर्शित अल्मा अँड ऑस्कर हा ऑस्ट्रियन चित्रपट दाखवून महोत्सवाची सुरुवात होईल.’इंडियन पॅनोरामा’ मध्ये भारतातील 25 पूर्ण लांबीचे चित्रपट तसंच 19 लघुपट दाखवले जाणार आहेत.
52 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मानकरी आशा पारेख यांच्यासाठी महोत्सवात विशेष विभाग असणार आहे. तसेच 183 आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शित केले जातील. मणिपुरी चित्रपटसृष्टीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, मणिपूर राज्य चित्रपट विकास संस्थेनं जतन केलेले प्रत्येकी पाच चित्रपट आणि लघुपटही दाखवले जातील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत