मुंबई ते पुणे आणि दानापूर दरम्यान अतिरिक्त चार विशेष गाड्या चालविणार!

पुणे/मुंबई आणि दानापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने दिवाळी उत्सवात गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पुणे/मुंबई आणि दानापूर दरम्यान ४ अतिरिक्त विशेष ट्रेन चालविण्याची घोषणा केली आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०१४८१ ०१४८२ दानापूर – पुणे विशेष १५ नोव्हेंबर २०२३ (बुधवार) रोजी दानापूर येथून सकाळी ६.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५.३५ वाजता पोहोचेल. तर, ट्रेन क्रमांक ०१४८३ पुणे – दानापूर अतिजलद विशेष १४ नोंव्हेबर २०२३ (मंगळवार) रोजी पुणे येथून संध्याकाळी ७.५५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसर्या दिवशी पहाटे ४.३० वाजता पोहोचेल.
या दोन्ही ट्रेन दौंड कर्ज लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज चियोकी, पं. दीनदयाल उपाध्याय जं. बक्सर आणि आरा स्थानकांवर थांबणार आहे. ट्रेन क्रमांक ०१४८५सीएसएमटी – दानापूर विशेष १४ नोव्हेंबर २०२३ (मंगळवार) रोजी सीएसएमटी येथून रात्री ११.५५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसर्या दिवशी सकाळी ७ वाजता पोहोचेल. दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज चियोकी, पं. दीनदयाल उपाध्याय जं. बक्सर आणि आरा स्थानकांवर थांबणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत