देश-विदेशमुख्यपान

पोलीस उपनिरीक्षकाने हवालदाराच्या चार वर्षीय चिमुरडीवर केला अत्याचार.

राजस्थानमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस हवालदाराच्या ४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला आहे. ही घटना राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात उडली आहे.
येथील उपनिरीक्षकास पोलीस लाईन परिसरात तैनात करण्यात आलं होतं. पण, राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुवास पोलीस ठाण्यात कर्तव्यासाठी येण्याचे निर्देश उपनिरीक्षकास देण्यात आले होते. त्यानुसार राहुवास येथील एका सहकारी हवालदाराच्या घरी उपनिरीक्षक भाड्यानं राहत होता. तेव्हा, शेजारी राहत असलेल्या दुसऱ्या हवालदाराची ४ वर्षीय मुलगी अंगणात खेळत होती. यावेळी उपनिरीक्षकाची वक्रदृष्टी या चिमुरडीवर पडली. उपनिरीक्षकाने चिमुरडीला आमिष दाखवून खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.

चिमुरडीने अत्याचाराची माहिती आईस सांगितली. नंतर जयपूर पोलीस ठाण्यात हवालदार असलेले चिमुरडीचे वडील रात्री कामावरून घरी आले. तेव्हा सगळी माहिती त्यांना देण्यात आली. त्यांनी तातडीनं राहुवास पोलीस ठाणे गाठून उपनिरीक्षकाविरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. यानंतर स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यावर पोलिसांनी उपनिरीक्षकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!