शरद पवार- अजित पवार यांची पुण्यात भेट,

आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघांची भेट झाली. शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी ही भेट झाली. दिवाळी सणाच्या निमित्तानं स्नेहभोजनासाठी पवार कुटुंब एकत्र आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याभेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे पवार म्हणाले.
राज्यातील जनतेला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ही दिवाळी सर्वांना सुखाची, आनंदाची जावो असे शरद पवार म्हणाले. प्रसारमाध्यमांनी अजित पावर आणि प्रतिभाताई पवार यांच्या तब्बेतीबद्दल विचारले. यावेळी शरद पवार म्हणाले की, सगळ्यांची तब्बेत चांगली असल्याचे शरद पवार म्हणाले. दरम्यान, आज शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात भेट झाल्यानंतर अजित पवार हे दिल्लीला रवाना झाले आहे. दिल्लीत अजित पवार हे अमित शाह यांची भेट घेण्याची माहिती मिळत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत