महाराष्ट्रमुख्यपान

लालपरीची वाहतूक सुरुच; अनुचित प्रकार नाही, तूर्तास सुरळीत सेवा.

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेने सातवा वेतन आयोग आणि विलीनीकरण या मागण्यांसाठी ६ नोव्हेंबर पासून एसटी संपाची हाक दिली होती. पण त्याकडे एसटी कर्मचान्यांनी पाठ फिरवली असून एसटी वाहतूक सुरळीत आहे.

महाराष्ट्रातील २५० आगारातील सकाळी ७ वाजेपर्यंत च्या सर्व बस फेऱ्या एसटी आगारातून व्यवस्थित मार्गस्थ झाल्या आहेत. (रात्र वस्तीचे सर्व मुक्काम आपल्या नियोजित थांब्यावरून निघाले आहेत.) कुठेही अनुचित प्रकार घडलेला नसून वाहतूक तूर्तास तरी सुरळीत सुरू आहे असे एसटी महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान या संपावरून आता एसटी कर्मचारी संघटनांमध्येच जुंपली आहे. सदावर्ते यानी साडे पाच महिन्यांचा संप मागे घेताना सातवा वेतन आयोग मिळाला असा दावा केला होता तर आता पुन्हा का सातवा वेतन आयोग मागत आहेत असा सवाल करत तर लबाडी करत असल्याचा आरोप एसटी कर्मचारी काँग्रेस आणि महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेने केला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!