धाराशिव शहरातील पोलीस स्टेशन समोर चारचाकी ने घेतला पेट,आकाशात धुराचे लोट आनं बघ्यांची तोबा गर्दी !

पत्रकार : विजय अशोक बनसोडे
धाराशिव : दि 05 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी साडे बारा ते पावणे एकच्या सुमारास धाराशिव शहरातील पोलीस स्टेशनच्या अगदी समोरच MH 16 AJ 2809 या चारचाकी वाहनाने गाडी स्टार्ट करत असताना स्पार्किंग होऊन पेट घेतला.
याबाबत सविस्तर असे की, धाराशिव शहरातील पोलीस स्टेशन समोरच श्री.शिवाजी डांगे (वाहन चालक व मालक ) हे आपल्या MH16.AJ 2809 वाहनामध्ये गाडी स्टार्ट करत असताना, स्पार्किंग होऊन गाडीने पेट घेतला. ही गंभीर परिस्थिती पाहता चारचाकी मालक व चालक श्री.डांगे शिवाजी यांनी प्रसंगावधान राखून गाडीतील कागदपत्रासह गाडी बाहेर धाव घेतली. तेवढ्या वेळात चार चाकी गाडीने चांगलाच पेट घेऊन आगीने रौद्र रूप धारण केले होते. तर यावेळी गंभीर परिस्थितीचे भान ठेवून उपस्थितांनी तात्काळ अग्निशामक दलाच्या गाडीला पाचरण केले. तर अग्निक्षमन दलाच्या गाडीने तात्काळ येऊन चारचाकी गाडीच्या आगीवर नियंत्रण मिळवले.
यावेळी नगरपालिका स्वच्छता विभागाचे श्री.विलास गोरे अग्निशमन दलाच्या गाडीवरील कर्मचारी श्री.संजय कसबे यांनी परिश्रम घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत