
आज राष्ट्रीय शेतकरी दिन आहे. मातीत खपून जगासाठी अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.केंद्र आणि राज्य सरकारचे विविध विभाग तसंच मंत्र्यांनी शेतकरी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. देशाचे माजी प्रधानमंत्री दिवंगत चौधरी चरणसिंग यांच्या स्मरणार्थ २३ डिसेंबर हा त्यांचा जन्मदिन दरवर्षी शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी प्रधानमंत्री चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत