
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने आक्रमक सुरूवात केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दक्षिण आफ्रिकेच्या स्वैर गोलंदाजीचा चांगलाच फायदा उचलला. त्याने फटकेबाजी करत 3 षटकात बिनबाद 35 धावा केल्या.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने आज धडाकेबाज सुरूवात करत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 24 चेंडूत 40 धावा चोपल्या. मात्र कगिसो रबाडाने त्याची ही खेळी संपवली अन् भारताला पहिला धक्का दिला.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सुपर संडेला वर्ल्ड कप 2023 मध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर सामना खेळला जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत