राज ठाकरेंचा BDD चाळ दौरा

बीडीडी रहिवाशांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्याशी शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली .वरळी बी डी डी चाळीच्या पुनर्विकासाला सुरुवात झालेली आहे. मात्र इथल्या रहिवाशांच्या काही अडचणी आहेत या अडचणी यावेळी जाणून घेतल्या. या प्रश्नासंदर्भात राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा केली होती. काही महिन्यापूर्वी मनसेने म्हाडाच्या अधिकाऱ्यांना वरळी इथे लोकांच्या शंका दूर व्हाव्या यासाठी एक सादरीकरण देखील करण्यास सांगितले होते एकूणच या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी बी डी डी चाळ येथे भेट दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत