महाडच्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू.

महाडमधील ब्लू जेट केमीकल कंपनीत शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास आग लागली होती. जवळपास १० तासनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. आगीत आतापर्यंत ९ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर दोन कामगार अजूनही बेपत्ता आहेत.
या कंपनीत आधी स्फोट होऊन आग लागली. त्यात ११ कामगार अडकल्याचं सांगण्यात येत होतं. तर पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जे कामगार कंपनीत अडकले होते. त्यापैकी ९ जणांचे मृतदेह हाती आले आहेत. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ७ जणांचे तर तर आज(४ ऑक्टोबर) सकाळी २ कामगारांचे मृतदेह सापडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या स्फोटाची भीषणता लक्षात घेता काल NDRF च्या पथकाला पाचारण करण्यात आलं होतं.
स्फोट झाल्यानंतर कंपनीत अडकलेल्या कामगारांचा पत्ता लागत नसल्याने एनडीआरएफचं पथक बोलवण्यात आलं होतं. हे पथक शुक्रवारी संध्याकाळी दाखल झालं. यानंतर सुरु केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये ४ मृतदेह हाती लागले होते. यानंतर एक-एक करत ३ मृतदेह हाती लागले होते. यानंतर आज सकाळी आणखी दोन मृतदेह हाती आल्याने ११ पैकी नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत