सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा मध्ये १११ जागांवर प्राध्यापक भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील २१५ रिक्त पदांपैकी १११ जागांवर पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती होणार आहे. त्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, आठवड्याभरात जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांतील रिक्त जागांचा प्रश्न काही प्रमाणात कमी होणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक भरती न झाल्याने विविध शैक्षणिक विभागातील जवळपास निम्म्यापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. काही विभागांमध्ये एकच प्राध्यापक, प्राध्यापकांवर अतिरिक्त कार्यभाराचा ताण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्राध्यापक नसल्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर, तसेच विद्यापीठाच्या क्रमवारीवरही होतो. त्यामुळे तात्पुरती मलमपट्टी म्हणून विद्यापीठाकडून कंत्राटी पद्धतीने प्राध्यापक भरती केली जाते. त्यानुसार नुकतीच १३३ प्राध्यापकांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत