न्यायाची लंगोट

प्रा.मुकुंद दखणे
दुःख तर होणे स्वाभाविक आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला न्याय मिळत
नाही.न्यायासाठी तो/ती तडफडतो. रात्र न रात्र झोपेत नाही. खरोखरच अन्याय करणारा सुखाने झोपतं असेल कां? न्याय काय आहे? हे जेवढे अन्याय होणारा जाणतो, तेवढे
न्यायाधिश सुद्धा जाणत नाही.तर अन्याय करणारा कसा जाणणार?
न्यायाची अपेक्षा ही नैसर्गिक अपेक्षा
आहे. भारतीय संविधान भारतीयांना जशी संरक्षणाची गॅरंटी देते तेवढीच न्यायाची सुद्धा गॅरंटी देते.आणि म्हणूनच न्याय प्राप्त करून घेणे हा मुलभूत अधिकार ठरतो. पण त्याकरिता 51क(क) भारतीय संविधानाचे पालन करणे प्रत्येक नागरिकांचे, राष्ट्रपति [प्रथम नागरिक] पासून तर सर्व सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे हे आपापले कर्तव्य होय. आणि प्रत्येकाने आपआपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत ठेवले तर एका कडुन दुसर्यांवर अन्याय होण्याची शक्यताच दुर्मिळ ठरते. नैसर्गिक अन्यायावर उपाय नसतो पण सर्व मिळून त्यावर ऐकोपाच्या भावनेने मार्ग शोधु शकतो. एकदाचा मानवतावादाचा विचार/दृष्टिकोन स्विकारला की, अन्याय करण्यांची प्रवृत्तीच खत्म होते.धर्माचा उद्देश ही मानवतावाद मानवा मानवा मध्ये उत्पन्न करणे व तो कायम टिकऊन ठेवणे असा च असतांना धर्म आणि अन्याय,एकाचवेळी एकाच सामाजिक समुदायात, राष्ट्रात जर होत असेल तर असा धर्म हा धर्मच नसतो तर तो अधर्म ठरतो.
न्यायाची परिभाषा निश्चित करण्यासाठी आणि न्याय या मुलभूत हक्काचे संरक्षण कारण, भारतीय संविधानाने अनुच्छेद 124 द्वारे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केलेली आहे. भारताची प्रचंड लोकसंख्या, अंधश्रद्धा, अवैज्ञानिक रूढी, परंपरा, अधर्म संस्कृती आणि अमानविय जातीव्यवस्थेता लक्षात घेता भारतातील एकंदरीत न्यायाधिशांची, न्यायालयांची संख्या अत्यंत तुटपुजी आहे, हे मान्यच करावी लागेल. तरीही संविधानाच्या अनुच्छेद 375प्रमाणे भारताच्या संपुर्ण राज्यक्षेत्रातील दिवाणी, फौजदारी,महसुली, अधिकारितेची सर्व न्यायालये, न्यायीक कार्यकारी व प्रशासकीय असे सर्व प्राधिकरण व सर्व अधिकारी यांनी भारतीय संविधानाच्या तरतुदींना अधिन राहुन राहुन आपआपले कार्याधिकार,कर्तव्य बजावण्याचे प्रामाणिकपणे चालु ठेवतील अशी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची अपेक्षां होती पण राष्ट्रीय भावनेच्या अभावाकारणास्तव आणि भ्रष्ट मानसिकता कारणास्तव तसेच कर्तव्यात कसूर करण्याच्या प्रवृत्ती कारणास्तव भारतात, भारतीय न्याय व्यवस्थेत, संसदेत, प्रशासकीय इमारतीत आणि सामाजिक सार्वजनिक जीवनात न्याय मिळणे जवळपास दुरापास्त होत आहे. तरीही, भारतीयांची धर्म, ईश्वरावर जेवढी श्रद्धा आहे, त्यापेक्षा किंचित अधिक श्रद्धा न्यायाधिशांवर, न्यायीक प्राधिकरणावर आहे. आणि म्हणूनच, न्यायालये तुडुंब भरलेली आढळता. मंदीरातही रांगाच्या रांगा आहे पण न्याय मिळतो तो न्यायालयात. मंदीरातील पुजार्याला सुद्धा न्यायासाठी, न्यायालयात धाव घ्यावी लागते, हे स्पष्ट करते की न्यायाधिशाचे स्थान हे सर्वोच्च आहे. ईश्वरापेक्षाही मोठे आहे, महान आहे.
मानवीय लोभ,राग, मोह, माया, मत्सर, अंहकार, समान तृषा कारणास्तव एक व्यक्ती दुसर्या वर अन्याय करण्यास प्रवृत्त होत राहत असल्या कारणास्तव अन्यायाची कडी तुटत नाही, ती अव्याहतपणे सुरू आहे.
मानवी मनात उत्पन्न होत असणारी तृष्णा कारणास्तव, समाजात अन्याय, अत्याचार, बलात्कार राजरोज होत राहतांना आपण पाहतो. आणि म्हणूनच भगवान बुद्धाने, धर्माची म्हणजेच सुसंस्काराची, सुसंस्कारित शिक्षणाची आवश्यकता प्रतिपादन केलेली आहे. भारतातील सुसंस्कारित शैक्षणिक वातावरणाच्या अभावा कारणास्तव देशातील गल्ली पासुन तर दिल्ली पर्यंत नरकयात्रा समान अन्याय अत्याचार सुरू असतांना आपण पाहतो आणि ज्यांचेवर संविधानाने संरक्षण करण्याची, न्याय करण्याची जबाबदारी भारतीय संविधानाने, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सोपविलेली आहे, तेच स्वतःवरील होत असलेला अन्याय, अत्याचार, क्षमविण्यास सक्षम ठरत नाही, तर सर्व सामान्यांना न्याय कसा प्राप्त होणार?
न्याय ही एक भूमिका आहे. न्याय ही प्रवृत्ती आहे. न्यायाचा आणि धर्माचा अत्यंत जवळचा संबंध आहे. धर्माची प्रवृत्तीच जर न्यायीक नसेल, मानवतेची नसेल तर समाजात न्यायीक भूमिका कशी उत्पन्न होईल? जसे, विहिरीत पाणी असेल तर च दोराच्या सहाय्याने बकीटीने पाणी बाहेर काढून, आपली तहाण भागविणे शक्य होते पण विहिरीत पाणी नसेल तर जशी तहाण भागविणे शक्य होत नाही त्याच प्रमाने धर्माच्या मुळ विचार उद्देशातच न्याय प्रवृत्ती नसेल तर न्याय कसा प्राप्त होणार? भारत भूमीवर हजारो वर्षांपासून समता नाही. समतेची धार्मिक दुर्मिळता आहे, समतेच्या दुर्मिळते कारणास्तव
भारतात विषम पोषक सामाजिक/धार्मिक वातावरणा कारणास्तव भारत देश सदिओसे सामाजिक गुलाम, सामाजिक गुलामगिरी कारणास्तव मानसिक गुलाम आणि मानसिक गुलामगिरी कारणास्तव राजकीय गुलामगिरीत सुखाने,दुखापतग्रस्त नांदत आहे.
भारताला स्वातंत्र्य होऊन ही, 75वर्ष
उलटून जाऊन,भारताला सर्वोच्च संविधान प्राप्त होऊन ही ,भारतीय मनामनातील धार्मिक /सामाजिक
गुलामगिरी प्रवृत्ती, अधर्म प्रवृत्ती
नष्टप्रायः होऊ न शकल्या कारणास्तव आणि भारतीयांची शीलप्रज्ञा जागृत न झाल्या कारणांस्तव भारतात अन्याय सुरू आहेत. ज्याचा त्याचा हक्क जो संविधानात्म आहे, तो हक्क सुद्धा मिळणे कठीण होऊन बसलेले आहे. दुर्मिळ होऊन बसलेले आहे. आणि अन्यायाची शीलशीला अव्याहतपणे सुरू आहे. जे सत्तेत आहे, जे न्यायाच्या खुर्चीवर बसलेले आहे, त्यांची जोपर्यंत अन्याय, अत्याचार करण्याची, बलात्कार, भ्रष्टाचाराची प्रवृत्ती कायम स्वरुपात शिल्लक आहे, तो पर्यंत भारत भूमीत न्याय दुरापास्त असणार आहे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मते, अन्याय करणार्यांपेक्षा अन्याय सहन करणे अधिक गुन्हा आहे. असे अन्यायग्रस्त लोक जर कां एकत्र आले आणि शिवाजी महाराजांची तलवार व ढाल बनुन, महात्मा फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी
बनले तर च भारतीय जमीनीवरील अन्याय अत्याचार प्रवृत्ती खत्म होईल आणि सर्वदूर न्यायीक भूमीका उत्पन्न राहील. आणि सर्वोच्च न्यायालयाची आवश्यकता नाममात्र राहील. आणि त्यावरील सर्वोत्कृष्ट उपाय म्हणजे, आपले अज्ञान, अंधश्रद्धा दूर करुन प्रज्ञा जागृत ठेवून,कोणी सोबत असो वा नसो
अन्यायाविरुद्धात ठामपणे उभे ठाकले पाहिजे. अन्याय सहन करणे बंद केले पाहिजे.अन्यायाविरोधात आवाज बुलंद केला पाहिजे.
चाॅहे जाॅन जाॅये या भाकर,अन्याय करणार्यांना मुहतोड जबाब दिला पाहिजे. अन्याय, अत्याचार करणार्यांना,करणार्या प्रवृत्तीला संपविले पाहिजे. तरच तो न्याय ठरतो आणि अन्याय संपविणारा न्यायाधिश ठरतो. अभ्यासाअंती हाच निष्कर्ष निघतो की, स्वसंरक्षणार्थ
भारतीय संविधानाला हीच अपेक्षा आहे
की, दुर्मिळ न्याय हा हक्क असुन ,तो वेळ पडल्यास हिसकावून घेतला पाहिजे आणि न्याय मिळेपर्यंत भारतीयांनी अन्यायग्रस्तांनी, लंगोट
घालुन सज्ज राहीले पाहिजे.तरच न्याय, न्याय ठरेल. आणि अन्याय करणार्या प्रवृत्ती खत्म होईल.मनामनातील अन्याय प्रवृत्तीया खत्म करणे म्हणजेच धर्म होय. आणि मानवी आत्मोन्नती सर्वोच्च सुंदर मार्ग म्हणजे अन्याय मुक्त समाज होय. म्हणूनच,न्यायाची लंगोट घालुन सज्ज राहिले पाहिजेत, अन्यायाविरुद्ध बंड केले पाहिजे.
🌷
प्रा.मुकुंद दखणे
यवतमाळ 9373011954
जयभीम 🙏🏾जयभारत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत