प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपान

पुण्यात आरपीएफ’ जवानाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार.

१७ वर्षांची मुलगी तिच्या प्रियकराबरोबर १२ सप्टेंबरला छत्तीसगडहून पुणे स्थानकावर आली. त्यांना पुण्यात लग्न करायचे होते. स्थानकावर पवार आणि त्याच्या साथीदारांनी दोघांना चौकशीसाठी ‘आरपीएफ’च्या ठाण्यात नेले. तेथून रेल्वे वसाहतीमध्ये सिद्धार्थ मल्टिपर्पज सोसायटी कार्यालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी युवकाला दुसऱ्या खोलीत ठेवून युवतीवर पवार आणि तिवारी यांनी पाच दिवस अत्याचार केला.

‘आरपीएफ’मध्ये पुणे रेल्वे स्थानकावर नियुक्तीस असलेला हवालदार अनिल पवार याच्यावर बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार कलमांन्वये लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेबाबत तत्परतेने कारवाई न केल्याबद्दल निरीक्षक बी. एस. रघुवंशी यांना ‘आरपीएफ’ने निलंबित केले आहे. पवारचा साथीदार कमलेश तिवारी याला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

पाच दिवसांनी प्रियकराकडून पवार आणि तिवारीने सहा हजार रुपये घेतले. त्यानंतर दोघांना सोडून दिले. या घटनेने भेदरलेले प्रेमी युगुल छत्तीसगडला गेले. तेथे मुलीने पालकांना हा प्रकार सांगितला. त्यांनी न्यायालयात तक्रार केली. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. आता हा गुन्हा पुणे रेल्वे स्थानक पोलिसांकडे तपासासाठी आला आहे. गुन्हा दाखल होत असल्याचे समजताच पवार पळून गेला आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!