नळदुर्ग येथे दलित वस्तीत घाणीचे साम्राज्य लहान मुलांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात
धनकचरा व्यवस्थापन झोपी गेलीयं का? नागरीकांची हाक
सफाई कामगारांना शासन नियमा प्रमाणे रोजगार उपलब्ध व्हावा
घनकचरा व्यवस्थापन ही नळदुर्ग शहराला लागलेली किड
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग शहर एक ऐतिहासिक शहर म्हणून महाराष्ट्रामध्ये चांगलीच ओळख आहे या शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दलित वस्तीत म्हणजे बुद्धनगर , भीमनगर , डॉ आंबेडकर नगर , मधील नागरिकां सह लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे .
गेल्या पंधरा ते वीस दिवस झाली कोणते ही सफाई कामगार किंवा व्यवस्थापन या वस्तीत फिरकले सुद्धा नाहीत गटारी तुडंबु भरल्यात परंतु प्रशासन मात्र शांत झोपी गेल आहे की काय ? आस सवाल नागरीकातुन केला जातोय मग हे झोपी गेलेलं प्रशासन केव्हा जागे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
मानवाच्या प्रत्येक कृतीतून तयार होणारा अनेक टाकाऊ पदार्थ आणी कचरा हा टाकाऊ पदार्थ सुद्धा मानवी समाजात घनकचरा व्यवस्थापन ही आर्थिक विकास पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने खूप मोठी गंभीर बाब आहे .
हवा पाणी जमीन प्रदूषित होऊन मानवाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो मग नगरपालिकेची घनकचरा व्यवस्थापन आणि या व्यवस्थापनाचे दुष्परिणाम मानवाच्या जीविताला धोका होणार असल्याचे यावेळी शहरातून बोलले जात आहे नळदुर्ग शहर स्वच्छ शहर आसे आसताना या शहरांमध्ये पसरलेला घनकचरा हे नळदुर्ग शहराचे सौंदर्य कमी करते हे सर्व कामगार कर्मचारी गावकरी यांनी लक्षात घेतलं पाहिजे या पसरलेल्या ओल्या व सुक्या कच त्यामुळे मानवाच्या आरोग्यास हानिकारक होऊ शकतो कारण घनकचऱ्यामध्ये रोगाचा प्रसार खूप मोठ्या जोराने होत असतो यासाठी घनकचरा व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन चालवणारी कंपनी आणि त्यांचे कर्मचारी झोपी गेलेत का ? असा सवाल नागरिकांतून उठला जातोय .
भीमनगर , बुद्धनगर , आणि डॉ आंबेडकर नगर मधील घनकचरा व्यवस्थापनाचे जे कर्मचारी आहेत ते सफाई कामगार आठ दिवसाला एक सफाई कामगार स्वच्छतेसाठी येत असतो पण गटारी काढल्याच्या नंतर गटारी उचलणारा जो ट्रक्टर आहे तो ट्रक्टर ओला कचरा सुका होई पर्यंत त्याच ठिकाणी लोळत आसतो मग घनकचरा व्यवस्थापन आणी घनकचरा व्यवस्थापनाची माणसं कोणत्या कामाचे फक्त महिन्याचे आलेलं बजेट उचलायचं कर्मचार्याना देयाचं आणि बाकीचे खिशात टाकायचे हा कंपनीचा त्याचा उद्योग ठरला आहे .
कंपनीला समाजाचं देणं का घेणं आहे , हा तर त्यांचा धंदा आहे .
घनकचरा वर्गीकरण विघटनशील कचरा आणि अविघटनशील कचरा ,घातक परिणाम आणि अघातक परिणाम यामध्ये वेगळा करून मानवाच्या आरोग्यास धोकादायक ठरू नये अशी प्रक्रिया व्यवस्थापन समितीने केली पाहिजे .
नळदुर्ग शहरात एकूण ५२ कर्मचारी असून यात ७ घंटागाडी आहेत शिवाय दोन ट्रॅक्टर आसताना दलित वस्तीत दुर्लक्ष का ? दलित वस्ती कडे जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे मग घनकचरा आरोग्य निरीक्षक कुठे आहेत झोपलेत का ? घनकचरा व्यवस्थापनाकडे सर्वांचे लक्ष वेधले पाहिजे घनकचरा व्यवस्थापन किती गरजेचे आहे आणि त्याची गरज काय आहे हे व्यवस्थापन समितीला समजलं पाहिजे कचरा मुक्त नळदुर्ग शहर करावयाचे असेल तर नळदुर्ग शहराचा दर्जा उंचवायचा आसेल तर नळदुर्ग शहरातल्या प्रत्येक गल्ली बोळातला कचरा ही लांब फेकला पाहिजे केवळ आठ ते दहा दिवसाला जाऊन कुठेतरी खराटा मारणे , कुठली तरी गटार काढणे म्हणजे हे घनकचरा व्यवस्थापनाचे काम नाही घनकचरा व्यवस्थापनाने व्यवस्थापन करायला हवं शहरातला प्रत्येक गल्ली बोळातला कचरा उचललाच पाहिजे आणि त्या कचऱ्याची विल्हेवाट कोणत्या प्रकारे लावावी याचे नियोजन करणे खूप गरजेचे आहे या कचऱ्यामध्ये होणारी रोगराई यावर कशाप्रकारे नियंत्रण आणता येईल याकडे घनकचरा व्यवस्थापन आणि नगरपालिकेच्या वरिष्ठानी जातीने लक्ष घालून या सर्व बाबी लक्षात घेतल्या पाहिजे आणि याचं निवारण केलं पाहिजे या घनकचरा व्यवस्थापना कडे आणी त्या कर्मचाऱ्या कडे लक्ष वेधले पाहिजे आणी त्याना शासनाच्या नियमा प्रमाणे रोजगार दिला पाहिजे
व्यवस्थापन समितीने कमीत कमी कचरा कसा करता येईल याकडे सर्वांनी पाहिलं पाहिजे प्रत्येक गल्लीबोळात कचऱ्याची ढिकारे घालणे यामधून लहान लेकरासह नागरिकांच्या आरोग्यास निमंत्रण देणे हा घनकचरा व्यवस्थापनाचा खोडसळपणा कुठेतरी थांबला पाहिजे यामधूनच पर्यावरणाचे संरक्षण करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे .शहरात घरात कचरा, दवाखाना , सर्व शाळा सार्वजनिक ठिकाणी समाज मंदिर स्वच्छतागृह व्यायाम शाळा मंदिर, मज्जिद , बौद्ध विहार अशा ठिकाणची व्यवस्थापन खूप चांगली असली पाहिजे तरच या मानव जातीच्या आरोग्याची काळजी वाटणार नाही
नळदुर्ग शहर स्वच्छ नाही झाले तर नळदुर्ग शहरातील घनकचरा व्यवस्थापन ही शहराला लागलेली कीड आहे आसे समजले जाईल .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत