प्रधानमंत्री मातृवंदना योजना कार्यक्रम आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्रात पार पडणार

प्रधानमंत्री मातृवंदना योजना कार्यक्रम आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्रात पार पडणार आहे. या कार्यक्रमात दोन सत्रं होतील. कार्यशाळांचं सत्र आधी होईल, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय महिला आणि बालविकास आणि अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटनाचं सत्र पार पडेल. महिला आणि बालविकास आणि आयुष राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई आणि इतर या सत्राला उपस्थित राहतील. महिला पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांसह आघाडीवरच्या महिला कर्मचारी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे महत्त्वाचे पैलू आणि या योजनेला आलेलं यश, योजनेची वाटचाल, या योजनेसाठीचं पोर्टल आणि मोबाइल एपचे महत्त्वाचे पैलू या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात येणार आहेत. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत योजनेला प्रोत्साहन देण्याच्या प्रधानमंत्रीांच्या दृष्टिकोनाला अनुसरून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं नवं पोर्टल विकसित करण्यात आलं आहे. सर्वसामान्य नागरिक, आघाडीवरचे कर्मचारी, पर्यवेक्षक, जिल्हा आणि राज्य पातळीवरचे नोडल अधिकारी यांच्यासह या योजनेतल्या विविध भागधारकांसाठीच्या सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचनापत्रिकेचं प्रकाशनही या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत