महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणराजकीय

निलेश राणेंची राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा.

लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या पाश्वभूमीवर भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केल्यामुळे राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे
भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्यातच आता भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राजकारणातून बाजूला होत निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. राजकारणात मन रमत नसल्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेत असल्याचं निलेश राणे यांनी सांगितलं आहे. एक्सवर निलेश राणेंनी पोस्ट शेयर करत भावना व्यक्त केल्या आहे.
सोशल मीडियावर शेयर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, गेल्या १९ ते २० वर्षात आपण सर्वांनी मला भरपूर प्रेम दिलेलं आहे. कारण नसताना अनेकांनी साथ दिल्याबद्दल मी आभारी आहे. भाजपात काम करण्याची संधी मिळाली, त्यासाठी देखील मी पक्षसंघटनेचा आभारी आहे. परंतु आता राजकारणात मन रमत नसल्याने मी त्यातून निवृत्ती घेत असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
निवृत्तीमागे खास असं कोणतंही कारण नसल्याचं देखील निलेश राणे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आता भाजपला कोकणात मोठा राजकीय धक्का बसला आहे. निलेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पूत्र आहे. सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ते एकवेळा खासदार राहिलेले आहेत.
राजकारणात आल्यानंतर खूप काही शिकायला आणि करायला मिळालं. काही सहकारी आणि कुटुंबातील लोकांनी मनात घर केलं. त्यामुळं कायम त्यांच्या ऋणात राहणं पसंत करेन. निवडणूक लढवण्यात आता मला रस राहिलेला नाही. टीका करणारे अनेक लोक ते करतच राहतील. परंतु राजकारणात स्वत:चा आणि इतरांचा वेळ वाया घालवणं मला पटत नसल्याचं सांगत निलेश राणे यांनी कुणाचं मन दुखावलं असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असंही म्हटलं आहे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!