
गुजरातमधील सूरत इथं एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केली आहे, यामध्ये तीन बालकांचाही समावेश आहे. शनिवारी सकाळी या कुटुंबानं लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमुळं ही घटना उघडकीस आली. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये मनिष सोलंकी, त्यांची पत्नी रीता सोलंकी, वडील कानू सोलंकी, आई शोभा सोलंकी आणि दिशा, काव्या आणि कुशल नामक तीन मुलांचा समावेश आहे. यांपैकी ६ जणांची विष खाल्यानं तर एकानं फाशी घेऊन आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोटही या कुटुंबानं लिहून ठेवली आहे. प्राथमिकदृष्ट्या यामागे आर्थिक कारण असू शकतं अशी माहिती सूरतचे पोलीस उपायुक्त राकेस बरोट यांनी दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत