जांभूळचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक संदर्भात आमदार किसन कथोरे यांची भेट

( राहुल हंडोरे यांजकडून )
बदलापूर दि. 4 मार्च
आंबरनाथ बदलापूर जवळ असलेल्या जांभूळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे या करिता डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठान शिष्टमंडळाने आमदार किसन कथोरे यांची बदलापूर येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवडणूक आचार संहिता संपल्या नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होणे बाबत मंत्रालयात बैठक आयोजित करून महिला बालविकास खात्याची पाच एकर जागा सामाजिक न्याय विभागाकडे हस्तान्तरीत करण्याची प्रक्रिया सुरु करणे बाबत अंबरनाथचे आमदार डॉ बालाजी किणीकर यांनाही सोबत घेऊन जांभूळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उचित स्मारक करण्यात येईल असे आश्वासन आमदार किसन कथोरे यांनी शिष्टमंडळाला दिले.
शिष्टमंडळात मंत्रालयातील माजी सह सचिव आय एम मोरे, माजी अति. जिल्हाधिकारी एस एस ससाणे, मंत्रालयातील माजी उप सचिव कैलास भांडलकर, माजी शासकीय अधिकारी प्रदिप ढोके, डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठान अध्यक्ष राहुल हंडोरे, रिप. जेष्ठ कार्यकर्ते दादासाहेब देठे, युवा कार्यकर्ते शंभु आचार्य, महिला प्रतिष्ठान अध्यक्षा कुसुम गौतम, कार्याध्यक्षा पुष्पा पवार, सचिव करुणा कातखडे आदींचा समावेश होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत