इडीच्या भीतीनेच अजित पवार सत्तेमध्ये बोरवणकरानी केलेल्या आरोपाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी-विजय वडेट्टीवार

नागपूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपाचे प्रकरण सध्या राजकीय वातावरण तापले आहे.
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनीही अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. नागपुरात माध्यमांनी त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी चौकशीची मागणी केली. वडेट्टीवार म्हणाले, माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असेल, तर राज्य आणि केंद्र सरकारच्या तपासणी यंत्रणांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी. केवळ चौकशीपुरते हे प्रकरण मर्यादित न ठेवता, यासंदर्भात गुन्हा दाखल व्हावा.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत