शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भिमा इथे पोलीस तैनात

कोरेगाव भीमा बंदोबस्तासाठी ३२ शे पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. या अभिवादन कार्यक्रमासाठी महावितरणकडून वीजपुरवठा आणि वीजसुरक्षेकरता विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शौर्य दिनानिमित्त ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला लाखो नागरिक कोरेगाव भिमा इथे येतात. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी चोख नियोजन केले आहे. महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी काल विजयस्तंभ परिसरातील वीजपुरवठया संदर्भातल्या कामांची पाहणी केली. सुरळीत वीजसेवा देण्यासाठी ३५ अभियंते आणि जनमित्रांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत